उदयनराजे म्हणतात, ‘शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण….’

मुंबई | देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. मात्र, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट असणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.

यावरून आता राजकारण तापले आहे. आता यावर खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज ही राज्याची नाही तर देशाची अस्मिता आहे, त्यामुळे शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. पण शिवजयंती साजरी करताना मात्र करोनाची काळजी घेण्यात यावी. ही प्रशासनासोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे ते म्हणाले.

साताऱ्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीस साध्यापणाने साजरी करण्यासाठी शिवजयंती मंडळांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध देखील घातले आहेत. यामुळे राज्यात शिवप्रेमींमधून संताप होण्याचे काही कारण नाही.’

‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा…’
‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे. राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते.

मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल कदमांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नीट बोलायचं असतं, चंद्रकांत पाटलांची गोपीचंद पडळकर यांना जाहीर समज…
‘पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का?’
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.