सचिनकडून भारतरत्न सन्मानाचा अपमान; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून टिका

मुंबई | शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास ७० दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. मास्टरब्लास्ट भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत.

अशातच राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांना ट्वीटचं राजकारण येत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग किंवा पॉपस्टार रिहानाबद्दल काही माहिती नाही. त्यांच्या ट्वीटला उत्तर देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांने मैदानात उतरावं हा देशाचा अपमान आहे, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सचिनसारख्या व्यक्तीला भारतरत्न देणं चुकीचं होते. भारतरत्नने सन्मानित व्यक्त विविध वस्तूंच्या जाहिराती करत नाही. हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान आहे, असेही शिवानंद तिवारी म्हणाले.

दरम्यान, ट्विटरवर सचिनला मोठ्या ट्रोल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केरळमधील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिनच्या पोस्टरला काळे तेल वाहून त्याचा निषेध नोंदवला. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

फेसबुक पोस्ट करत फडणवीस म्हणतात, ‘राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’
‘ठाकरे सरकारला देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का?’
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.