रेमडेसिवीर टंचाईचे खापर अभिमन्यु काळेंवर फोडणाऱ्या ठाकरे सरकारवर सेना नेत्याचीच सडकून टिका

अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी परमिल सिंग यांना आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कंपन्यांकडून औषध उपलब्ध करुन घेण्यात अपयश आल्याने त्यांची बदली केली गेली आहे, असे म्हटले जात आहे.

आता अभिमन्यु काळे यांच्या बदलीवर शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अभिमन्यु काळे यांच्यावर फोडण्यात आले आहे, असे शिवाजीराव आढळराव यांनी म्हटले आहे.

राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे, असे शिवाजीराव आढळराव यांनी म्हटले आहे.

तसेच अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.

मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध आहे. जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे, असेही शिवाजीराव आढळराव यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांचे युद्ध रंगले आहे. असे असताना अभिमन्यु काळे यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडीतील नेते नाराज होते. काळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानंतरच काळे यांची बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या मृत्यु दाखल्यावरही मोदींचा फोटो?; वाचा काय आहे सत्य
१८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी एक महिना पाहावी लागणार वाट; आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य
लोकांना घरी राहायला सांगता मग तुम्ही का निवडणूका घेता; भाजपच्या नेत्याने मोदींना सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.