शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल…

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केले जात आहे.

याचबरोबर सोशल मीडियावर त्यांच्याविषय खूप लिहिले जातंय आणि त्यांच्या अनेक गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशातच शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

Directorate of Archaeology and Museums, Maharashtra चे Director तेजस गर्गे यांनी त्यांच्या पेजवर हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या वॉलवरून हा फोटो अनेकांनी शेअर केला. शिवाजी महाराजांची ही खूण सातारा येथील संग्रहालयात असल्याचे त्यांनी या पोस्टमधून सांगितले. त्यांनी आजच्या दिवसाचा संबंध या फोटोशी असल्याचे सांगितले.

दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या अनेक गोष्टी अजूनही लोकांसमोर आलेल्या नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताचा आणि पायांचा ठसा आहे. मात्र तो जोपसण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाही. किल्ल्यावरील एका छोट्या मंदिरात त्यांचे हे पायांचे आणि हाताचे ठसे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
गश्मीर महाजनी साकारणार सरसेनापती हंबीरराव; पोस्टर पाहून मुजराच ठोकाल
पुन्हा लॉकडाऊन? नवे नियम लागू, वाचा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार
औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.