Share

किळसवाणे! शौचालयात धुतली शिवभोजन थाळीची भांडी, व्हायरल व्हिडिओने खळबळ

shivbhojan thali

राज्यातील गरीब लोकांना कमी पैशात भोजन देण्यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन व्यवस्था सुरु केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना सुरु केली होती. लॉकडाउनच्या काळात अनेक गरजू लोकांनी या शिवथाळी भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला. पण आता यवतमाळ जिल्हयात घडलेल्या एका प्रकारामुळे शिवथाळी भोजन योजनेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(Shiva Bhojan dish washed in the toilet viral video)

यवतमाळ(Yavtmaal) जिल्ह्यातील महागाव येथील शिवभोजन केंद्रात ग्राहकांना जेवणासाठी दिली जाणारी थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाशी संबंधित व्यक्तीचे हे शिवभोजन केंद्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे शौचालयात भांडी धुवून त्याच थाळीत गरीब लोकांना जेवण देत असल्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकप्रकारे गरीब लोकांची थट्टा केली जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिवभोजन केंद्राच्या स्वच्छतेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काही दिवसांपासून राज्यातील शिवभोजन केंद्रांबाबत तक्रारी येत होत्या. शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिले होते.

तसेच स्वछता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भातील निर्देश अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. याकरिता तपास पथके देखील स्थापन करण्यात आली होती. शिवभोजन केंद्रांवर कोणत्याही प्रकारची अस्वच्छता स्विकारली जाणार नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होते.

लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात देखील दिली जात होती. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. शिवभोजन थाळीची किंमत सुरवातीला १० रुपये होती. त्यानंतर लॉकडाउनच्या काळात शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली. लॉकडाउनमध्ये शिवभोजन थाळीमुळे अनेक गरीब लोकांचे पोट भरले.

महत्वाच्या बातम्या :-
‘चित्रपटात काम मिळावं म्हणून काळी जादू करायचे’, बॉलिवूड अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा
ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्याच बेडखाली राहायचा तरुण; ‘अशी’ झाली पोलखोल
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गावातच उभारली जाणार आयटी कंपनी; महाराष्ट्रात प्रथमच आगळावेगळा प्रयोग

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now