Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षांवर नुकतीच सुप्रीम कोर्टाची सुनावणी पार पडली आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सतत एकमेकांवर टीका करणे सुरु आहेत. यातच युवासेनेचे नेते शरद कोळी यांनी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी सत्तारांवर टीका केली आहे.
“अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग,” असे म्हणत शरद कोळींनी टीका केली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण चिन्हाची जबाबदारी निवडणूक आयोगाला सोपवली असल्याचेही ते म्हणाले आहेत. जर निवडणूक आयोगाने पक्षपातीपणाने निर्णय दिला तर ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील.
त्यामुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असेही शरद कोळी यावेळी म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटाने मिळून ५० खोके एकदम ओकेचा कार्यक्रम केल्यास राज्यात दंगल झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कोळींनी यावेळी दिला आहे.
तसेच सगळ्या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचाच आहे. यासोबतच धनुष्यबाण चिन्हदेखील ठाकरेंचेच आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सोलापुरातील ‘धाडस’ संस्थेचे संस्थापक शरद कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते त्यांच्या अनेक वक्तव्यांनी गाजले आहेत. यातच आता पुन्हा एकदा त्यांचे अब्दुल सत्तारांबद्दलचे हे विधान चर्चेत आले आहे.
महत्वाच्या बातम्या
Sharad Koli : गद्दारांना गाडण्याची शपथ, ५ हजार शाखा असणाऱ्या शरद कोळींच्या प्रवेशाचा सेनेला फायदा होईल का?
sharad koli : आदित्य ठाकरेंनी या खास माणसावर सोपवली मोठी जबाबदारी, गद्दारांना शिकवणार धडा
sharad koli : बऱ्या बोलानं शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्या नाहीतर.., युवा सेनेची शिंदे गटाला उघड धमकी
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी