मुंबई | औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन राजकारणात अनेक वक्तव्य आणि भुमिका समोर येत आहेत. या मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली. नामांतराची भूमिका फक्त शिवसेनेची असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
‘राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही,’ असे पटेल यांनी सांगितले. ते याबाबत शनिवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा निघेल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही.’
औरंगाबादच्या नामांतराविषयी चव्हाणांनी सांगितली काँग्रेसची भूमिका….
‘औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत,’ असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.
औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेनी पहिल्यांदाच केली भूमिका स्पष्ट…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका सर्वांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं आहे. त्यामुळे त्यावर आता फक्त सही शिक्का उमटायचा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
‘ज्या गालावर पोलिसांनी मारलं, त्याच गालावर राज ठाकरेंनी फिरवला प्रेमाचा हात’
उदयनराजे केंद्रीय मंत्री होणार? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
पाच बालकांना उचलून धगधगत्या आगीतून धावली होती शूर परिचारिका; काय घडलं होतं ‘त्या’ रात्री?