Shivsena : “कारकुन, रिक्षावाल्यांना मोठं करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?”

Shivsena : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना आपल्या सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. आता शिवसेना कोणाची यावरून दोन्ही गटात वाद पेटला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन तब्बल एक महिना झाल्यानंतर आता या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यावरून विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे.

बंडखोरांवर टीका करताना ते म्हणाले की, “उद्धव साहेब म्हणालेच आहेत की, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नका. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह सोडून तुम्ही तुमचा पक्ष काढा. पण ती हिंमत नाही. काल शपथग्रहण करताना हे बाळासाहेब ठाकरेंना विसरले का?, असा सवालही अरविंद सावंत यांनी केला.

पुढे अरविंद सावंत म्हणाले की, ज्या ठाकरे घराण्याने सामान्य माणसाला असामान्य केलं. ज्यांनी शिपाई, रिक्षावाला व आमच्यासारखे कारकुन यांना मोठ्या पदावर पोहोचवलं त्या ठाकरे घराण्याने स्वत:साठी कधी काही घेतलं नाही. ज्यांनी तुम्हाला एवढं भरभरून दिलं, त्यांनी एक आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद घेतलं तर काय बिघडलं? बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचा तुम्हाला आनंद व्हायला हवा होता.

यासोबतच भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या टीकेलाही अरविंद सावंत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, धोका देण्याचा दुर्गुण हा भाजपमध्ये आहे. काश्मीर, हरियाणापासून नितीश कुमारांपर्यंत याची अनेक उदाहरणे पाहिली आहेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी सुशील मोदींवर केली.

तसेच गोमंतक पक्षाचा विश्वासघात कोणी केला. यासोबतच हे प्रत्येक राज्यात पाठीत खंजीर खुपसण्यात तरबेज असल्याची टीकाही अरविंद सावंत यांनी केली. त्यामुळे सुशील मोदींनी एकदा स्वत:चाच इतिहास वाचावा, असा सल्ला अरविंद सावंत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
jalna : वऱ्हाडी बनून आले अन् 390 कोटींची मालमत्ता केली जप्त, आयकर विभागाची धडक कारवाई
Sharad Pawar : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, म्हणाले, वादविवाद वाढविणे योग्य नाही, मी बाहेर पडल्यावर…
उद्धव ठाकरेंना दिलासा, शिवसेनेची विरोधी पक्ष म्हणून निवड, ‘या’ बड्या नेत्याची विरोधी पक्षनेते म्हणून निवड
शिंदे गटाकडे वळणारी ३५ पदाधिकाऱ्यांची पावलं पुन्हा शिवसेनेकडे; वाचा काय आहे नेमकं प्रकरण