Shivsena : एक महिन्यापासून प्रतिक्षेत असलेला शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर काल पार पडला. शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहेत.
यातच आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा न सांगता आपला वेगळा पक्ष निर्माण करावा, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. याच आशयाचे एक वक्तव्य आता अरविंद सावंत यांनीदेखील केले आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, ज्या ठाकरे घराण्याने महाराष्ट्रातील सामान्य माणसाला असामान्य बनवलं. ज्यांच्यामुळे रिक्षावाला, शिपाई, टॅक्सीवाला, कारकून आज मोठमोठ्या पदावर पोहोचले. त्या घराण्याने स्वतःसाठी काय घेतलं? पहिल्यांदाच त्या घराण्यातील मुलगा आमदार झाला. एकजण मुख्यमंत्री झाला, तर काय बिघडलं? त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसला, असा सवाल त्यांनी बंडखोर आमदारांना केला.
तसेच, बाहेर पडायचं असेल तर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह सोडून तुम्ही तुमचा पक्ष काढावा. पण या लोकांची शिवसेना सोडण्याची हिंमत नाही. आमचं नाव वापरून स्वतःला शिवसेना म्हणायचं. मग शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचे नाव का विसरलात? असेही अरविंद सावंत म्हणाले.
काल झालेल्या शपथविधीवरही अरविंद सावंत यांनी आपले टीकास्र सोडले आहे. ९ ऑगस्टचा क्रांतिदिन हा महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता. ज्यांना चले जाव म्हणायला हवं होतं. त्यांचाच शपथविधी झाला. काहीही करा. आमच्याकडे या पावन होता. ही सगळी माणसं जनतेच्या मनातून उतरली आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.
संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यावरही अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी संजय राठोड यांच्यावर पूर्वी केलेलं भाष्य लोकांनी ऐकावं. त्यांना जे धुलाई मशीन नाव दिलं आहे ते अगदी योग्य आहे. हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेनेने ‘हा’ निर्णय परस्पर घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी
जनगणमन… राष्ट्रगीताचे शब्द कानावर पडताना माजी सैनिकाने घेतला शेवटचा श्वास; ६२ च्या युद्धात होता सहभाग
”काय ते शहाजी बापू पाटील, काय त्यांच्या तोंडातील मावा, शेजारी बसलं की समदं वास..”
Eknath Shinde : सर्व मलाईदार खाती भाजपकडे तर जुनी खाती शिंदे गटाला, बंडखोरी करून कमावलं की गमावलं?