Share

बंडखोरी शमवायला शिवसेना कृषिमंत्री भुसेंचा उपयोग करणार? शिंदेंसोबतचे ‘ते’ नाते कामी येणार?

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने संपर्क करण्यात येत आहे.(Shiv Sena will use Agriculture Minister Bhuse to quell rebel)

काल शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सुरतला गेले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यादरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. कृषिमंत्री दादा भुसे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी निवाळण्यासाठी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांना एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा मदत केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागातून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला होता. कृषिमंत्री दादा भुसे यांचे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी फार पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी नातेसंबंध आहेत. खासदार राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

त्यामुळे कृषिमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला पाठिंबा देतात का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर घेतलेल्या बैठकीला कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर केला असल्याची चर्चा रंगत आहे.

यासंदर्भात बोलताना कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले की, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव घेऊन जाण्याएवढा मी मोठा नेता नाही”, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
काल रात्री आदित्य ठाकरेंसोबत फिरणारा शिवसेनेचा ‘तो’ माजी मंत्रीही शिंदेना सामील; गुवाहाटीला रवाणा
शिंदेंच्या बंडामागे ना मुख्यमंत्र्यांवरची नाराजी, ना भाजपचा हात; राग आहे राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर
‘एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ते स्वगृही परत येतील’ – संजय राऊत

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now