Share

“कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल

शिवसेनेने(Shiv Sena) शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर तात्काळ कारवाई न करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.(Shiv Sena questions Supreme Court decision)

यामुळे शिंदे गटातील या १६ बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेण्यास देखील सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘न्यायाला विलंब होणे म्हणजे एकप्रकारे न्याय नाकारणे’, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले आहेत.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तात्काळ सुनावणी घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “दोन तृतीयांश आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात.”

“पण या आमदारांना त्यांचा एक गट म्हणून प्रस्थापित करता येणार नाही, असं कायदा सांगतो. असे असताना देखील गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून आपण पाहतोय तो शिवसेनेचा गट कोणता? म्हणजे तुम्ही कायद्याचे धिंडवडे काढत आहात आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्ट देखील गप्प आहे”, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत पुढे म्हणाले की, “आज कोर्टानं निर्णय दिला की विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय घेऊ नये. याचा अर्थ काय? कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे?”, असा सवाल देखील खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. देशातील संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे, असे देखील अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “बेकायदेशीररित्या निर्माण झालेल्या सरकारला याद्वारे एक प्रकारे सरंक्षण दिलं जातंय आणि वेळकाढूपणा केला जात आहे. यामुळे जर न्यायाला उशीर होत असेल तर त्याचा अर्थ न्याय नाकारला जात आहे. अशा प्रकारे न्यायाला उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षित नाही. कोर्टाकडे आम्ही आशा म्हणून पाहत आहोत”, असे देखील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
‘न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे’, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची नाराजी
मुख्यमंत्र्यांचे ते आरोप माजी मंत्र्यांने पुराव्यानिशी खोडले, भाजपला उघडे पाडत केली न्याय देण्याची मागणी
“गिरीश महाजन बालिश माणूस, त्यांनी आयुष्यभर माझ्या चपला हातात घेऊन मतं मागीतली”

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now