शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे(Shivsena) आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(Shiv Sena MLA stated the real reason)
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणखी आमदार जाणार असल्याचे सांगितले जात आहे. इतके आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले? यामागचे कारण शिवसेनेच्या एका आमदाराने सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यामागची कारणे सांगितली आहेत. शिवसेनेने भाजपसोबत जायला हवे, असा सल्ला देखील दीपक केसरकर यांनी दिला आहे.
शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “घराला आग लागली असेल तर आधी ती आग बुझवावी लागते. नंतर एकत्र येता येते. मी आदित्य ठाकरेंशी बोलत बोलत हॉटेलवर आलो. तुम्ही सगळे मिळून जे करू शकला नाही, ते मी एकट्याने केले आहे.”
“अजय चौधरी तिथे आले, सुनील शिंदे आले, माझी गाडी निघाली, माझ्यावर पळत ठेवण्यात आली. मी त्यांना फोन करून सांगितले मी हे कदापी सहन करणार नाही”, असे शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी युवासेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
“मी कोणाला घाबरत नाही. मी देखील शिंदे यांच्याकडे जाऊ शकतो. मला कोण अडवणार, मी पोलीस आयुक्तांना फोन करेन. कायदा सुव्यवस्था आहे. आमचा मान ठेवायला हवा होता. माझ्या घरी आज माणसे पाठविली. माझ्यावर पळत ठेवण्यात आली”, असे शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
“जे आमदार गेले ते आज सांगत होते का, त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस होते. त्यांना बळ दिले जात होते. याचा अर्थ काय? आम्हाला उद्धव ठाकरे साहेब उपलब्ध होत नव्हते. यामुळे या आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे आपल्या कैफियती मांडल्या. यामुळे हे सारे आमदार शिंदेंच्या जवळ गेले. त्यामागची भूमिका मी उद्धव ठाकरेंना समजावली. हे उद्धव ठाकरेंशी बंड नाहीय. आपल्याला भाजपासोबत जावे लागेल”, असे शिवसेनेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
महत्वाचा बातम्या :-
ईडीची धास्ती! आमदारांच्या बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत; भाजप सोबत जाण्याची करतायेत मागणी
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका, भरत गोगावलेंची पक्ष प्रतोदपदी केली निवड
अखेर बंडखोर शिवसेना आमदाराने सांगितले नाराजीचे खरे कारण; जाणून घ्या…