Share

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची माहिती समोर येत आहे.(Shiv Sena MLA nitin deshmukh hear attack)

यादरम्यान शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना सुरतमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने सकाळी अकोला शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या पतीचे अपहरण करण्यात आले आहे, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती.

‘नितीन देशमुख यांनी काल रात्री मला फोन केला होता. त्यांनी मला अकोल्याला परत येणार असल्याचे सांगितले होते, पण ते परत आले नाहीत’, असे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले होते. बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेल्याचे सांगितले जात आहे.

पण सकाळी त्यांना छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसोबत सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. सुरतमधील मेरिडीयन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गुजरातचे गृहमंत्री आणि भाजपचे आमदार हर्ष सांघवी या १३ आमदारांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गुजरातमधील भाजप नेत्यांचा एक गट आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये ही भेट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बंडखोर एकनाथ शिंदेंना दिघे कुटुंबीयांनी सुनावले; आनंद दिघेंनी गद्दारी सहन केलीच नसती..
“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये जावे एवढी भाजपची लायकी नाही”
आमदारांना जबरदस्तीने सुरतला पळवून नेलय; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्नीची पोलिसांत तक्रार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now