मनसेने काढला वचपा! शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी केला मनसेत प्रवेश

मुंबई | येत्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला धक्के बसत आहेत. मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंगळवारी मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळबेंनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला मोठे खिंडार पडले आहे.

तर आता कोकणात मनसेने शिवसेनेला दणका दिला आहे. खेड तालुक्यातील मेटे गावातील मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा अध्यक्ष सह शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये सेनेचे जिल्हा सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले यांच्या माध्यमातून गाव मेटे शिवसेनेचे शाखा अध्यक्ष रविंद्र शिगवण व त्यांचे कार्यकर्ते सचिन पंडे, बाबु बुरटे, विनय शिगवण, हरि बुरटे, संतोष पंडे, शांताराम भुवड, कृष्णा गावडे, मनोहर खोचरे, सखाराम धाडवे, प्रदिप गावडे, सुरेश खोचरे.

यासोबतच विलास गावडे, संजय गावडे, रविंद्र खोचरे, दिनेश खोचरे, काशिराम गावडे, प्रसन्ना शिगवण, पांडुरंग गावडे, पांडुरंग बुरटे, शंकर खोचरे, संतोष गावडे, कृष्णा पंडे, सोनू खोचरे, जयंत शिगवण, भिकाजी पंडे,विनय खोचरे, शशिकांत शिगवण, संदिप कांदेकर, दिलीप खोचरे, शिवा खोचरे, शंकर खोचरे यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.

मनसेच्या आऊटगोईंगवर बाळा नांदगावकर म्हणतात..
मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेमध्ये खळबळ उडाली. मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू असून, ते रोखण्याचं पक्ष नेत्यांपुढे आव्हान आहे.

याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना विचारले असता. ते म्हणाले, ”काहींनी पक्ष सोडल्यानं पक्षाला काही फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”, असे म्हणत मनसेतून बाहेर पडणाऱ्यांवर नांदगावकर यांनी हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या बातम्या
लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास
मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.