Share

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली.

राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी त्याच्या फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख केला आहे. १४ मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यामुळे पक्षाकडून टीझर पोस्टर्स जास्तीतजास्त व्हायरल करण्यात येत आहेत.

https://www.facebook.com/shivajiraoadhalraopatil/posts/542872913876317

 

शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडिओ वापरण्यात आला होता. यामुळे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचे असुद्या. इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची.

अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? असा सवाल करत लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली हे नकली हिंदुत्ववादी आहेत असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता.

१४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे. पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले आहेत.

महत्वांच्या बातम्या:-
राज ठाकरेंवर टीका मात्र ब्रिजभूषण सिंह यांनी शरद पवारांचे केले कौतुक; वाचा काय म्हणाले?
“तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे, पण अमित ठाकरे मात्र सुरक्षित आहेत, कुठे लपले आहेत ते?”
“काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सगळं सांगते…, दुसऱ्या लग्नाबाबत सोनाली कुलकर्णीचा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now