तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव; शिवसेना नेत्याची भाजप आमदाराला धमकी

बुलढाणा | राज्यातील कोरोना परिस्थीतीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्र सरकार राज्याला लस, बेड, ऑक्सिजन पुरवण्यात दुजाभाव करत असल्याचा आरोप राज्यातील मंत्र्यांनी केला आहे. राज्यात भाजप नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगू लागला आहे.

काल बूलढाणा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते. असं गायकवाड यांनी म्हटल्यानंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद चांगलाच वाढला आहे.

भाजप आमदार संजय कुटे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळला. यावेळी कुटे यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यानंतर आमदार गायकवाड यांनी आमदार कुटे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

‘संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. त्याला सर्व शौक आहेत. तो मवाली आहे. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो. तुझ्या मायने दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव. तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो.’ अशी थेट धमकीचं गायकवाड यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्राकडून ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठा होत नाही. मी फक्त यावर वस्तूस्थिती मांडली तर  माझ्या पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का?’ असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

‘तुम्ही माझी काय तक्रार करता, मीच भाजपच्या लोकांविरोधात तक्रार करतो. या भाजपमूळे राज्यातील लोक मरू लागले आहेत तुम्ही काय आंंदोलन करता? तुमच्या प्रवृत्तीमुळे माझा महाराष्ट्र मरतो आहे. याला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही काय उपोषण करता मीही आंदोलन करेन,’ असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त भाषेत टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंंद्रकांत पाटील यांनी आमदार संजय गायकवाड आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “वायफळ बडबड न करता महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा. शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता गायकवाड”. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर होणार कारवाई.? आव्हाडांनी दिला काळ्याबाजाराचा पुरावा
सत्ता गेल्यापासून फडणवीस माशासारखे तडफडत आहेत- एकनाथ खडसे
आनंदाची बातमी! कोरोनावर ९९ टक्के प्रभावी पडणारा नेझल स्प्रे लस आता भारतातही मिळणार
“मोदी, फडणवीसांना महाराष्ट्रापेक्षा पाकीस्तान आणि बांगलादेश महत्वाचा वाटतो”

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.