“मेल्यावर साहेबांना काय सांगू?” मराठी भाषेसाठी संतप्त दिवाकर रावतेंचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते विधान परिषदेत चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला चांगले धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचा मख्यमंत्री असताना मराठी मुद्द्यावर वेगळेच चित्र दिसत असल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली.

याबाबत दिवाकर रावते विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणे चुकीचं आहे. सभागृहात कामकाज सुरू असताना इंग्रजी भाषेचा वापर होतोय हा प्रकार हास्यास्पद आहे.

यावेळी बोलताना रावते यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनेला घरचा आहेर देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकही शब्द व्यक्त करण्यात आला नाही. अशी खंत व्यक्त केली आहे.

शिवसेनेला मराठी बाबत एक शब्द उच्चारता आला नाही हे दुर्दैव आहे अशी भावना संतप्त दिवाकर रावते यांनी व्यक्त केली आहे. तसेच मराठी विद्यापीठाचा मुद्दा, मुंबईतील बॉम्बे क्लबचे नाव आणि मराठी भवन या मुद्द्यांवर रावते यांनी आघाडी सरकारला टोले लगावले आहेत.

याशिवाय, संभाजीनगर नाही बोलायचं कारण हे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये नाही असं बोलल्यावर शांत बसायचं. यासांरख्या अनेक मुद्द्यावंर मला बोलावं लागत आहेत हे वाईट आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि त्यांनी मला विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ? असा सवाल दिवाकर रावते यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
खुशखबर! शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा
पेट्रोल-डिझेलवरील कर केंद्रानेच कमी करावेत, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे प्रतिउत्तर
“हिरेन यांची हत्या सचिन वाझेंनीच केली, त्यांना तात्काळ अटक करा”- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.