Share

Shivsena : मोदी सरकारकडे बहुमत असूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घाबरते, शिवसेनेची जहरी टीका

Uddhav Thackeray Narendra Modi

Shivsena : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. तसेच भाजपसोबत मिळून आपले सरकारही स्थापन केले. तेव्हापासून राज्याचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे कायम एकमेकांवर टीका करणे सुरु आहे.

यासोबतच ईडीकडून अनेक नेत्यांवर छापेमारी करून त्यांच्यावर कारवाईही सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

मोदी सरकार हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासोबतच सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे, असे जे सुरु आहे, त्यामुळे विष्णूचे आवडते फूल असलेले ‘कमळ’ बदनाम झाले आहे. ऑपरेशन लोटस म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

तसेच केंद्र सरकार व त्यांच्या सूत्राधारांना २०२४ चे भय वाटते. हे भय केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे आहे. इतके मोठे बहुमत असतानाही या मंडळींना भय का वाटावे? याचे उत्तर एकच. त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे.

त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थ्यांवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. पण या न्यायनिवाड्यास विलंब होऊ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

यासोबतच आज राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरु आहे की, देशात संभ्रमित युग अवतरले आहे. या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल!, असेही या अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्रात गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक, खासदार संजय राऊत यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांना उचलून तुरुंगात टाकले गेले असल्याचेही सामनामध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Pune : माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर.., शिक्षकाची विद्यार्थिनीला धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Shivsena : शिवसेना-संभाजी ब्रिगेडची झाली युती, राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार?
Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर
Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now