शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री राणेंना शह; चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते

कुडाळ। चिपी म्हणजेच सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्‍घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून चांगलाच वाद पेटला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते विमानतळाचे उद्‍घाटन होणार आहे.

केंद्रीय मंत्री राणे यांनी दिल्लीत मंगळवारी (ता. ७) चिपी विमानतळाचे उद्‍घाटन ९ ऑक्टोबरला केले जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता शिवसेनेकडून या विमानतळाच उद्‍घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री शिंदे यांच्याशी चर्चेनंतर ९ ऑक्टोबर ही उद्‍घाटनाची तारीख निश्‍चित झाल्याचे जाहीर केले.

या संदर्भात काल बुधवारी एक पत्रकार परिषदे घेण्यात आली व त्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. तसेच केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्‍घाटनाचे धाडस करू नये, असा इशाराही शिवसेनेकडून त्यांना देण्यात आलाय.

विमानपत्तन प्राधिकरण नागर विमानन महानिदेशालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे आता सर्वांच या उद्‍घाटन सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे.

विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

९ ऑक्टोबर दिवशी दुपारी १२ वाजता मुंबईहून टेक ऑफ घेतलेले विमान सिंधुदुर्ग विमानतळावर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी उतरेल आणि पुन्हा १ वाजून ३५ मिनिटांनी ते विमान मुंबईला जाण्यासाठी टेक ऑफ घेईल. १ तास १० मिनिटांचा हा प्रवास एअर अलायन्स या कंपनीच्या विमानातून होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
भारताने नाकारलेल्या उन्मुक्त चंदची अमेरीकेत तुफानी खेळी; ठोकल्या तब्बल ३०४ धावा 
सलाम! गरीबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी रोज २५ किमीचे डोंगर पार करून जाते ही शिक्षीका 
सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक
लंडनची मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावी आले; आता गायी म्हशींच्या व्हिडीओतून महिन्याला ५ लाख कमावतात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.