राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना घर देण्याची घोषणा केली होती. पण या घरासाठी पोलिसांना ५० लाख रुपये मोजावे लागतील, असे जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सांगितले होते. यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळत आहे.(Shiv Sena angry over Jitendra Awhad’s announcement)
सध्या वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सुरु करण्यात आले आहे. या बीडीडी चाळीमध्ये सध्या २२५० पोलीस कुटूंबीय राहत आहेत. त्यांना बीडीडी चाळीमध्ये ५० लाख रुपयांमध्ये घरे दिली जातील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. माणुसकीच्या भावनेतून हा निर्णय घेत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते.
पण या निर्णयावर आमदार आदित्य ठाकरे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ आहे. बीडीडी चाळीतील बहुतांश भाग हा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना बीडीडी चाळीमध्ये ५० लाख रुपयांना घरे दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांमध्ये सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. याचा फटका पुढील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना बसू शकतो, असे सांगितले जात आहे. यावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बीडीडी चाळीत २२५० पोलीस कुटूंब राहतात.
त्यांना बीडीडी चाळीचा पुनर्विकास करून त्यामध्ये ५०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. यासाठी लागणारा बांधकाम खर्च हा सुमारे १ कोटी ५ लाख आहे. त्यामुळे बीडीडी चाळीत पोलिसांना फुकट घरे मिळणार नसून त्यासाठी ५० लाख रुपये मोजावे लागतील, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
“मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर मालकी हक्क नाही. असे प्रत्येक ठिकाणी झालं तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वाटर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही. हा निर्णय फक्त वरळीसाठी आहे. फुकटात घर देता येणार नाही. सरकार मोठ्या मनाने घर देत आहे. यासाठी ५० लाख रुपये किंमत द्यावी लागणार आहे”, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या :-
१५ वर्षीय रेखाचा ‘या’ अभिनेत्याने जबरदस्तीने घेतला होता किस, रेखाच्या डोळ्यातून आलं होतं पाणी
RSS ची बाजू घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर केलेली टीका श्याम देशपांडेंना भोवली, शिवसेनेने केली हकालपट्टी
पाण्यावर चालणारी सायकल ते मिनी वॉटर पंप, ६० वर्षांच्या वृद्धाचे संशोधन पाहून अवाक व्हाल