Share

Shivsena : शिवसेना-संभाजी ब्रिगेडची झाली युती, राज्याच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार?

Uddhav Thackeray Sambhaji Brigade

Shivsena : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी हातमिळवणी केली आहे. तसेच इथून पुढे ते एकत्र काम करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आज ही घोषणा केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना, लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी छोटे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी एकत्र येण्याबद्दल आमचे एकमत झाले. तसेच भविष्यातील निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र मिळून लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी संभाजी ब्रिगेडचे स्वागत केले. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी ही युती केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आल्याचा आपला आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यासाठी आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा भाजपचा कट आहे. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समितीदेखील नेमण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

पक्षफुटीनंतर शिवसेनेला आपला पक्ष टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यातच पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षण आणि बहुजन समाजात काम करण्याच्या उद्देशाने पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली होती. पुढे त्याचे तीसपेक्षा अधिक विभाग सुरु करण्यात आले. यातील जिजाऊ ब्रिगेड हा महिलांसाठी तर संभाजी ब्रिगेड हा विभाग तरुणांसाठी कार्य करत होता. त्यांच्या विविध कार्यांमुळे हे दोन विभाग पुढे कायम लक्षात राहिले.

महत्वाच्या बातम्या
Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर
heart attack : सावधान! आजच सोडून द्या ‘या’ चार सवयी नाहीतर तुम्हालाही येऊ शकतो ह्रदयविकाराचा झटका
Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now