शिवसेना (Shivsena): राज्यातील ठाकरे-शिंदे वाद अजूनही शांत झालेला नाही. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटातील आमदारांच्या एकमेकांवरील टीकाटिप्पणी सतत सुरूच आहेत. आता या वादाला आणखी एक नवीन वळण मिळाले आहे.
मंगळवारी रात्री २ ऑगस्टला पुण्यात माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर आता ठाकरे-शिंदे या दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दल शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्यावर आता निशाणा साधला जात आहे. सोलापूरमधील शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्याबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“तानाजी सावंत पैशाने माजलेला बोकड आहे. पाच हजार कोटींची त्याची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही,” असे शिवसैनिक म्हणाले. पक्षप्रमुखांनी ज्या तानाजी सावंतला विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तोच सावंत आता कोण आदित्य ठाकरे? असे विचारतो. तीवरे धरण हे खेकड्यांनी फोडलं असे म्हणणाऱ्या तानाजी सावंतला फक्त पैशाची मस्ती आहे, याला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाही अशी तीव्र टीका शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्यावर केली आहे.
तानाजी सावंतांसोबतच त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. शहाजीबापू पाटील हे स्वतःला छत्रपतींचा वंशज समजतात आणि त्यांना बायकोला साडी घेता येत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जर असे लोक आरोप करत असतील तर शिवसेना शांत बसणार नाही. या बंडखोरांना निवडणुकीत पाडणार तर आहोतच याशिवाय त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचेही शिवसैनिक यावेळी बोलले.
शिवाय या गद्दारांपैकी कोणीही सोलापुरात आले तर, सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा ईशाराही शिवसैनिकांनी दिला. यासोबतच आदित्य ठाकरे यांच्या सभांना मिळणारा पाठिंबा गद्दारांना बघवत नाही. तो पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
ज्याप्रमाणे मोघलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसत होते, त्याचप्रमाणे यांना उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे दिसत आहेत. या चाळीस बंडखोरांना पुढील काळात मतदारसंघातील लोक ठोकल्याशिवाय राहणार नाहीत, असेही शिवसैनिक यावेळी म्हणाले आहेत. शिवसैनिकांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
टोलनाक्यांचा जनक मीच, पण आता…; टोल संदर्भात नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
..म्हणून मी मंगळसुत्र गळ्यात न घालता हातात घालते; अमृता फडणवीसांनी सांगीतले अजब लाॅजीक
‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक
‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक