Share

Sambhajinagar: शिंदेसेनेचा वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजमध्ये राडा, महिलांसह ग्राहकांना मारहाण, कुंटणखान्याची तोडफोड

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी (Mukundwadi) भागात रविवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना (शिंदे गट ) यांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर धाड टाकली. या कारवाईत त्यांनी लॉजमध्ये असलेल्या महिलांना व ग्राहकांना चोप दिला आणि लॉजची तोडफोड केली.

रात्रीच्या वेळी लॉजवर धाड

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ च्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील दोन लॉजवर हे प्रकार घडले. या लॉजमध्ये अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे. या लॉजमध्ये उपस्थित असलेल्या तीन महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी (Mukundwadi Police) त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील चौकशी सुरू केली आहे.

स्थानिकांचा आक्रोश, पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप

या भागातील नागरिकांनी संबंधित लॉजवर महिन्यांपासून अनैतिक धंदे सुरू असल्याची तक्रार केली होती. विशेष म्हणजे यापैकी एक लॉज थेट शाळेसमोर असल्याने स्थानिक नागरिक विशेषतः महिला संतप्त होत्या. या प्रकाराविषयी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात (Mukundwadi Police Station) कार्यरत काही अधिकाऱ्यांना माहिती असूनही कारवाई झाली नव्हती, असा नागरिकांचा आरोप आहे.

अवैध दारू व जुगाराचे अड्डेही कार्यरत?

मुकुंदवाडी परिसरात केवळ वेश्याव्यवसायच नव्हे तर अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डेही खुलेआम चालत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या साऱ्या गोष्टींवर पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे वातावरण आहे. त्यामुळेच लोकांनी व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही धडक कारवाई केली.

घटनेनंतर पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तोडफोड आणि मारहाणीबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now