…त्यामुळे वानखेडे स्टेडियमला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, शिवसैनिकांची मागणी

मुंबई | क्रिकेट स्टेडियमच्या नावाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अहमदाबाद येथील मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले. नुकतेच या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव गुजरातमधील स्टेडियमला देण्यात येते. तर मग मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचेही नाव बदलण्यात यावे अशी मागणी समोर येत आहे. त्यामुळे आता स्टेडियम नावांच्या मागणीची राजकीय गणित मांडली जात आहेत.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी काही शिवसैनिकांनी केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासात महत्वाचे असणारे वानखेडे स्टेडियमवरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सध्या तशा पोस्ट व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्रात आमच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहेत. त्यांच्या नावाने वानखेडे स्टेडियम ओळखले जावे अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. याबाबत राज्यातील मोठे शिवसेना नेते कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडीयम बनवून त्याला स्वताचे नाव दिले होते’
सरपंच निवडीनंतरच्या मिरवणुकीत पैशांची उधळण, पैसे घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड
महिलेसोबत अरेरावी आणि राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, मनसैनिकांनी कर्मचाऱ्याला दिला चोप
कंगना पुन्हा बरळली! म्हणतीये, ‘श्रीदेवीनंतर फक्त मीच…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.