Share

‘राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करतेय’, बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांचे आंदोलन

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.(Shiv Sainiks’ come to support of rebel MLAs)

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि नाशिक मध्ये काही ठिकाणी आमदारांच्या शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली.

यादरम्यान काही ठिकाणी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना पाठिंबा दर्शवला आहे. आमदार संजय जाधव यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. यावेळी शिवसैनिकांनी महाविकास आघाडी तोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यावेळी शिवसैनिकांनी राष्ट्रवादीवर आरोप देखील केले आहे.

https://www.facebook.com/mieknathshinde/posts/622292119254529

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या आंदोलनाचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक जमले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. महाराष्ट्र्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना समर्थन देण्यासाठी आंदोलन केले आहे. पण मुंबई, पुणे या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत.

पुण्यात शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड केली आहे. तसेच शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. मुंबईत देखील शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
बंडोबांना आणखी एक दणका! बंडखोरांच्या मुलांवर शिवसेना करणार ‘ही’ कठोर कारवाई
सलमान नाही तर ‘या’ अभिनेत्याच्या सिक्स पॅक्स ऍब्सवर फिदा आहे कतरिना, नाव वाचून अवाक व्हाल
मातोश्रीवर ठाकरेंसोबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेत्याला आला शिंदेंचा फोन; वाचा पुढे काय घडलं..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now