शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्टचा बोर्ड फोडला, आता अदानी समूहाने घेतला मोठा निर्णय

मुंबई । मुबंई मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या अदानी कंपनीचा बोर्ड शिवसैनिकांनी फोडला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा बोर्ड लावण्यात आला होता.

विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली आहे. त्यानंतर आता अदानी कंपनीकडून या बोर्डबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आधीच्या कंपनीच्या ठिकाणी आम्ही ब्रॅन्डिंग करत आहोत आणि हे ब्रॅन्डिंग सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांच पालन करुन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, किंवा या नावाच्या ब्रॅन्डिंगमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या निकषानुसारच या सर्व गोष्टी केल्या जातात. या ठिकाणी व्यवस्थापनाचे अधिकार असलेली आधीची कंपनी ही जीव्हीके कंपनी होती. जिथे जीव्हीकेचे ब्रॅन्डिंग होते तिथे अदानी एअरपोर्ट ब्रॅन्डिंग करत आहे, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आले होते.

शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजगी व्यक्त केली होती. यावर मराठा समाज देखील नाराज असलेले दिसून येत होते.

ताज्या बातम्या

धक्कादायक! पिझ्झामध्ये सापडला काचेचा तुकडा; 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून रक्ताची धार

धक्कादायक! पुण्यातील १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, दहावीला मिळाले होते ९५ टक्के

नादच खुळा! साठी पार केलेल्या आजोबांनी बांधले डोक्याला पुन्हा बाशिंग; सर्वत्र आजोबांची चर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.