शिवसैनिक तापले! मुंबई विमानतळावर लावलेल्या‘अदानी एअरपोर्ट’फलकची जोरदार तोडफोड

मुंबई। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा पूर्णपणे अदानी समूहाकडे आल्यानंतर अदानी समूहाने विमानतळाच्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट लिहिलेले फलक लावले होते, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावलेला अदानी एअरपोर्ट हा नामफलक शिवसैनिकांनी तोडफोड करत काढून टाकला आहे.

याआधी मुंबई विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीकडे होता. या कंपनीच्या नावाच्या जागी आज विमानतळावर अदानी एअरपोर्ट लिहिलं होत. मात्र या अदानी एअरपोर्ट नावाला शिवसेना आणि इतर काही संघटनांनी आक्षेप घेतला होता.

व शेवटी काही वेळातच अदानी एअरपोर्ट लिहिलेला फलक शिवसैनिकांनी तोडफोड करत हटवला आहे, व अदानी एअरपोर्ट नावाचं फलक लावल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला.

याआधीही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी ताब्यात येताच अदानी समूहाने पहिल्यांदा कंपनीचे मुख्यालय (गुजरात) अहमदाबादला हलवले आहे. व त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली होती.

मात्र त्यानंतर मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जावे…याशिवाय इतर कोणतीही ओळख असू नये असं मत शिवसेनेकडून मांडण्यात आल होत.

मात्र या संदर्भात अदानी समूहाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही व शेवटी अदानी समूहाने विमानतळाच्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट लिहिलेले फलक लावलं त्यानंतर आता फलक लावताच शिवसैनिक संतप्त झाले व फलक तोडून टाकला आहे.  जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांना शिवसेना भवनच्या आत नेऊन फटके देणार; राणेंच्या धमकीने राजकारणात खळबळ
चक दे इंडिया! ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पहा निर्णायक गोल
अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबेडीत; लग्नाची झाली पूर्ण तयारी
धक्कादायक! पिझ्झामध्ये सापडला काचेचा तुकडा; 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून रक्ताची धार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.