Share

Shivsena: ‘वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू, तोंडाला काळे फासू’; गद्दारांविरोधात शिवसैनिक आक्रमक

Shivsena

शिवसेना (Shivsena): एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे – शिंदे वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. शिवसेना कोणाची याचे निदान अजूनही लागलेले नाही. ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांच्या एकमेकांवरील टीकाटिप्पणीवरून हा वाद आता हाणामारीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे.

मंगळवारी २ ऑगस्ट रोजी पुण्यात शिंदे गटातील आमदार आणि माजी व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली. त्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवेसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांनी हा हल्ला होण्याआधी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी बंडखोरांच्या गाड्याच नव्हे तर तोंडही फोडू असे वक्तव्य केले होते. मंगळवारी सकाळी नांदेडमध्ये शिवसेनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कोकाटे पाटील यांनी हे वक्तव्य केले होते.

“वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू. गाड्या फोडू, तोंडाला काळे फासू, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू, त्याची काळजी करू नका. शिवसैनिक त्यासाठी समर्थ आहे,” असे दत्ता कोकाटे पाटील म्हणाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कात्रज भागात एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत सामंत आले होते, त्यावेळी हा हल्ला झाला. याचवेळी मंगळवारी रात्री कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत हल्लेखोरांच्या हातात शस्त्रे कोठून आली, त्यांना माझ्या गाडीचा नंबर माहिती कसा झाला? असा सवाल करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

बंडखोर आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना अटक केली आहे. यात पुणे शहर अध्यक्ष, हिंगोली येथील पदाधिकारी आणि अन्य चार जणांचा समावेश असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. उदय सामंत यांनी हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा निषेध व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या
Uddhav Thakre: एक गुलाब गेला तर फरक पडत नाही, माझ्याकडे गुलाबाचे झाड, मी नवीन गुलाब फुलवीन – उद्धव ठाकरे
Shatrughan Sinha: ‘या’ अभिनेत्रीच होणार होत शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न; पण तिने केल पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न
Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल
Bengali actress: एकीने न्युड होऊन गोंधळ घातला तर एकीने शिवलींगावर लावले कंडोम, वाचा सगळ्यात वादग्रस्त अभिनेत्रींबद्दल..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now