शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून(Shivsena) निदर्शने करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहे.(Shiv Sainik and rebel MLA’s supporters shout loudly)
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थनार्थ आज मोर्चा काढण्यात आला होता. तसेच राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला होता. यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली आहे. जयसिंगपूरचे अपक्ष आमदार आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. जयसिंगपूरमधील शिवसैनिकांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोध केला होता.
आज जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या विरोधात आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर काढण्यात आला होता. तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी दुसरा मोर्चा काढला होता.
शिवसेनेचा मोर्चा आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या समर्थकांचा मोर्चा जयसिंगपूरमधील एक चौकामध्ये समोरासमोर आले. त्यानंतर शिवसेनेच्या आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. यावेळी शिवसेनेच्या आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
यानंतर शिवसेनेच्या आणि राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सध्या जयसिंगपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
अखेर भाजप-शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला! पहा शिंदे गटातील कोण कोण मंत्री होणार..
पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे गट मनसे सोबत जाणार? दीपक केसरकरांनी केला खुलासा
संजय राऊतांच्या भाषेमुळेच शिवसेनेवर सत्ता गमवायची वेळ आली; शिवसेना आमदाराचा राऊतांवर घणाघात