यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?

मुंबई | देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट असणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत.

तसेच सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, कीर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहेत. ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने आपल्या नियमावलीत म्हटले आहे.

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा नियमांचे पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर यावेळी कोरोना, मलेरिया, डेंगी यासह अन्य आजारांविषयी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मंत्री कार्यकर्त्याला सांगतात ‘आधी त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घे’; आॅडीओ क्लिप व्हायरल
“पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे”
पुण्यात आत्मह.त्या केलेल्या तरुणीचे राज्यातील ‘या’ मंत्र्यासोबत कनेक्शन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.