Share

Shiv Bhojan Thali : गोरगरिबांचा आधार संपणार? शिंदे सरकार शिवभोजन थाळी बंद करण्याच्या तयारीत, ‘हे’ कारण आले समोर

Shiv Bhojan Thali

Shiv Bhojan Thali : राज्यात शिंदे-फडणवीस हे नवे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. यासोबतच अनेक नवनवीन योजनाही सुरु करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या अनेक योजनांवर आक्षेपही घेण्यात येत आहे.

यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास महाविकास आघाडीसोबतच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या निर्णयाचा अनेक गरजूंना फटका बसणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारला शिवभोजन थाळीत गैरव्यवहार झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा योग्य तो निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेमध्ये लोकांना १० रुपयांत जेवण मिळत होते. त्यामुळे ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी मोठा आधार समजली जाते.

राज्यात अनेक ठिकाणी शिवभोजन थाळीचे केंद्र सुरु करण्यात आले होते. राज्य सरकारकडून हे केंद्र चालवणाऱ्या लोकांना मदतही केली जाते. शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत जवळपास ८८ हजार ४६३ थाळ्यांची विक्री होत असते.

मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला या योजनेत गैव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आता ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
supriya sule : बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात राडा, दोन गट आले आमनेसामने; वाचा नेमकं काय प्रकरण?
Tanaji sawant : “आता मराठा समाज या तानाजी सावंताची खाज कशी उतरवतो ते बघाच”
Tanaji Sawant : “पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांची १ लाख वेळा माफी मागतो”
shivsena : शिवसेनेला मोठा धक्का! एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजी करत मुंबईतील मोठा नेता शिंदे गटात सामील

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now