“उध्दव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं काम चांगलं; तेच खरे शिवसैनिक, त्यांच्याकडून काहीतरी शिका”

मुंबई  | कोरोनाची लाट ओसरत नाही तोच तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनार पट्टीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात तौत्के चक्रीवादळाच्या पाहणीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.

यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल कोकणात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावर अनेक सवाल केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याला दौरा कसा म्हणणार? मुख्यमंत्री नुकसान झालेल्या भागात गेले तरी का?

मालवणमध्ये वायरी गावात सकाळी ७ वाजल्यापासून लोक त्यांची वाट पाहत बसले होते. तिथे त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला? कुणाचे अश्रू पुसले? मुख्यमंत्री हवाई दौरा न करता जमीनीवर उतरले. त्याचा फायदा काय झाला? असे सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केले.

ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात फिरत होते. मी घरी राहिलो तर उद्या मला उत्तरं द्यावी लागतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा केला का? कोकणातील जनतेने बाळासाहेबांवर खुप प्रेम केलं. पण उध्वजींनी या नात्याचा गैरफायदा घेतला. शिवसेना आणि कोकण हे नातं उध्वजींना कळलं असतं तर कोकणवासीयांचा असा अपमान केला नसता.

उध्दवजींपेक्षा एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. शिंदेंनी किमान कोकणवासियांना मदत तरी पाठवली. बाळासाहेबांचा मुळ शिवसैनिक कसा असतो हे शिंदेंनी दाखवून दिलं. त्यामुळे शिंदेंकडून काहीतरी शिका. हे दु:ख वाढवणारे मुख्यमंत्री आहेत, दु:ख पुसणारे  नाहीत. अशी खरमरीत  टीका नितेश राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जुगाड! बाईने प्रेशर कुकरमध्ये दोन मिनिटांत बनवल्या चपात्या, पहा व्हिडिओ
माझ्या पार्थिवाला माझ्या पत्नीने अग्नी द्यावा आणि…; शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाने घेतली फाशी
महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले; पैलवानाचा विजेच्या धक्क्याने दुःखद मृत्यू
प्रेयसीने जबरदस्तीने केले तरुणासोबत लग्न अन् लैंगिक शोषण; वाशिममधील धक्कादायक घटना

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.