दिल्ली, 13 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची? गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर निर्णय येणे बाकी आहे. मात्र आता 14 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या याचिकांची यादी करण्यात आली असून त्यावर सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
घटनापीठामध्ये न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. नरसिंह यांचा समावेश आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या यादीत या प्रकरणाला 501 क्रमांक देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सहा महिन्यांपूर्वी शिवसेना सोडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकारही स्थापन केले. मात्र शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
हे सरकार असंवैधानिक आहे असे शिवसेनेचे म्हणने आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करावयाचे मुद्दे एकत्रितपणे मांडण्याचे निर्देश दिले होते.
सत्तासंघर्षाच्या बाबतीत न्यायालयातील घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहेत. गेल्या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १६ आमदारांचे निलंबन प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली होती.
त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र आता हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाला विलंब होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला भलेमोठे खिंडार! शरद पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्यावर भाजपचे जाळे
पाकिस्तानला हरवून जेमिमाने विराट स्टाईल जल्लोश करताच खेळाडूंनी धावत मारली मिठी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! शरद पवारांचा सर्वात जवळचा ‘हा’ नेता भाजपने फोडला