Shinde Group : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये प्रचंड वाद पेटला आहे. शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेऊ असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यातच आता दसरा मेळाव्याबाबतीत आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे.
शिंदे गटातील शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंना एक ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि हिंदुत्व हाच शिवसेनेचा पाया आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कसंदर्भात कायदेशीर सल्ला मागितला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे सोने लुटले जाते. आम्ही जो महानगरपालिकेकडे अर्ज केला आहे, त्यात आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारांची आणि हिंदुत्वाची भूमिका पुढे नेत आहोत. परंतु, दुसऱ्या गटाने अर्ज केला आहे तो गट हा महाविकास आघाडीत असून महाविकास आघाडीतील तो एक घटक पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आम्ही शिवसेना प्रमुखांची परंपरा पुढे नेण्याचे काम करत आहोत. दुसरा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असल्याने तो शिवसेना प्रमुखांची भूमिका पुढे नेऊ शकतो का, असा प्रश्न महापालिकेला पडला असल्याचेही ते म्हणाले.
तसेच दुसऱ्या गटाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडत महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे. त्यांना जर शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्याच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाच्या विचारांची आणि राष्ट्रहिताची सभा आयोजित करायची असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे शेवाळे म्हणाले आहेत.
त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडायला हवे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आमचा संबंध नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. ही भूमिका जर स्पष्ट केली तर शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार प्रकट होतील, असा विश्वास शिवसैनिकांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्यांनी आधी महाविकास आघाडीची साथ सोडली असल्याची भूमिका स्पष्ट करावी, असेही राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Uddhav thackeray : ‘ तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली का?’ उद्धव shivsena : ठाकरेंनी भर सभेत ‘या’ महिलेवर ओढले ताशेरे
Uddhav thackeray : ‘मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना संपवायची आहे’; उद्धव ठाकरे म्हणतात ‘तो’ मुन्नाभाई नेमका आहे तरी कोण?
Amit shah : तुम्ही आम्हाला जमीन दाखवायचा प्रयत्न केला तर आम्ही…; अंगावर आलेल्या शहांनाच ठाकरेंनी घेतले शिंगावर
Shivsena : हिंमत असेल तर पुढच्या महीन्याभरात…; जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्या शहांना उद्धव ठाकरेंचे जाहीर आव्हान