शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवरुन आज सर्वाच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मंगळवारीही याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होत आहे. राज्यातील या सत्तासंघर्षाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयात आहे.
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद करत ठाकरे गटाचा युक्तिवाद मोडण्याचा प्रयत्न करत आहे. साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरच बोट ठेवले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना ठाकरेच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायाला पाहिजे नव्हता. त्यांनी राजीनामा का दिला? उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ होता. त्यांनी ते सिद्ध करायला पाहिजे होते. पण त्यांनी थेट राजीनामा दिला. त्यामुळे १६ आमदारांमुळे हे सरकार पडले हे सिद्ध होत नाही, असे साळवे यांनी म्हटले आहे.
हे सरकार आमदारांच्या बंडखोरीमुळे नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे पडले आहे. त्यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच राजीनामा दिला. त्यांनी तसे करायला पाहिजे नव्हते. तसेच आता जर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अवैध ठरवला गेला, तर चर्चेला अर्थ असेल, असेही साळवे यांनी म्हटले आहे.
१६ आमदारांना अपात्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलाचं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले होते. पण त्याचा बचाव करताना साळवेंनी पुन्हा युक्तिवाद केला. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांकडे नव्हतात, असे साळवे यांनी सांगितले आहे.
तसेच हरिश साळवे यांनी ठाकरे गटाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. अजय चौधरी यांचे गटनेतेपद बेकायदेशीर आहे. उद्धव ठाकरेंनी वर्षावर बैठक बोलावली होती. त्यावेळी फक्त १४ आमदार तिथे उपस्थित होते, असे साळवेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
फुट सभागृहात पडलीये, शिवसेना पक्षात नाही; सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी आली बाहेर
लाखो रुपयांची देणगी, शेकडो विद्यार्थ्यांना जेवण, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत माणूस आहे शेतमजूर
तळपत्या उन्हात सुर्यासारखे 360 डिग्री षटकार मारतीये ही गावाकडची मुलगी, व्हिडीओजनी उडवली खळबळ