Shinde group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड फक्त राज्यातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. तसेच त्यांच्यासोबत गेलेले शिवसेना आमदार शहाजी पाटील हेही चांगलेच चर्चेत आले होते. काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, अशी त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.(Chief Minister Eknath Shinde, Shinde Group, MLA Shahaji Patil, Praveen Darekar, Ganpatrao Deshmukh)
आता त्यांच्याबद्दल मोठी बामती समोर आली आहे. शहाजी पाटील यांनी आपल्याला विधानपरिषदेवर पाठवा असे साकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना घातले असल्याची माहिती मिळत आहे. पण आमदाराच्या या मागणीनंतर संपुर्ण शिंदे गटात खळबळ उडाली आहे.
शेकापचे पुढील आव्हान पाहून शहाजीबापू यांनी पळ काढल्याची चर्चा आहे. प्रवीण दरेकरांना साकडे घालताना त्यांनी विठ्ठ्ल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना आमदार करा, अशीही मागणी केली आहे. शहाजी पाटील यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडून शहाजी पाटील यांना सतत पराभव स्वीकारावा लागला होता. ते शेकापचे नेते होते. पण त्यानंतर त्यांनी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन सांगोला मतदार संघातून निवडून आले होते.
आता पुढच्या विधानसभेच्या निवडणूकीत शेकापचे आव्हान मोठे असेल, त्यामुळे आपल्याला विधानपरिषदेवर पाठवा अशी मागणी त्यांनी प्रवीण दरेकरांना केली आहे. त्यामुळे आव्हान स्वीकारण्याचे सोडून त्यांनी आधीच आपल्या मतदार संघातून पळ काढल्याची चर्चा आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघातून अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधानपरिषदेवर पाठवा, अशी मागणी शहाजीबापू यांनी केली आहे. त्यांनी जाहीरपणे अशी मागणी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकही त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
Vaishali Thakkar : वैशाली ठक्करने आत्महत्या का केली? सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
NCP : ‘पंचायत समिती सांभाळता न येणार्यांनी बारामती जिंकण्याची भाषा करू नये’; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले
Sharad Pawar : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणणाऱ्या पवारांना भाजपने दिलं उत्तर; म्हणाले उद्धवजींची लाज…