एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गटात येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे.(Dilip Lande, Eknath Shinde, Shinde group)
शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटात गेले आहे. पण शिंदे गटात काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काही नेत्यांची खदखद समोर येताना दिसून येत आहे. कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार यांची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवासोबत बाचाबाची झाली होती. आता आणखी एका आमदाराने मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबईच्या चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी वर्ग आपलं ऐकत नाही, ते अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देतात, असे दिलीप लांडे यांनी म्हटले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांकडून सतत खोटं बोललं जात आहे. अधिकारी मंत्र्यांना चुकीची माहिती देत आहे. प्रशासनातील अधिकारी काम करत नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय जागेत नामफलक लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण २ वर्ष झाले तरी त्यांनी लावल्या नाहीत. सुचना देऊन काम होत नसतील तर आम्ही काय फक्त नाश्ता करायचा का? असे म्हणज त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दिलीप लांडे यांच्या या वक्तव्यामुळे ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलीप लांडे यांची ओळख ठाकरे कुटुंबाच्या जवळचे आमदार म्हणून होती. पण त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दिलीप लांडे हे आधी मनसेचे नगरसेवक होते. पण त्यानंतर २०१९ मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावरुन आमदार म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, अब्दुल सत्तारही सध्या चांगलेच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला येऊन १०० दिवस पुर्ण झाले आहे. त्यानिमित्त मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेण्याचे काम सुरु होते. त्यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्याच्या सचिवाला शिवीगाळ केल्याचे बातमी समोर आली होती. त्यामुळे सत्तार नाराज असल्याच्याही चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : महापालिका निवडणूकीत मनसे भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी जाहीर केला ‘हा’ निर्णय
विनायक राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधवांचा पाय खोलात; ‘या’ केसमध्ये पोलिसांनी केली कठोर कारवाई
Rutuja latke : अंधेरी पोटनिवडणूक: ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या मार्गावर