Share

“शिंदे आणि फडणवीस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या करतात” , एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी या भेटीवर मतं व्यक्त केलं आहे. “आजारी पडल्यानंतर भेट घेणं स्वाभाविक आहे. मात्र दीड तासाच्या चर्चेत मनसेनं सत्तेत सामील व्हावं अशी चर्चा झाली का?”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.(“Shinde and Fadnavis party in five star hotel”, Eknath Khadse criticize)

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या गटाला आगामी काळात कुठेतरी जावे लागेल. कोर्टाने काही निर्णय दिला तर एक तर प्रहार गटात जावे लागेल किंवा मनसेमध्ये जावे लागणार आहे.”

“त्यांना कोणत्या तरी गटामध्ये सामील व्हावे लागणार आहे. मनसेत जाण्याच्या दृष्टीने या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे”, असे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

“राजकारणामध्ये चिठ्ठी देण्याचे प्रकार हे चालत राहतात. कधी ते लेटर तर कधी प्रेमाची चिठ्ठी असतेतर कधी सूचना असतात. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची एकनिष्ठ संधी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल”, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, “पावसामुळे अनेक लोकांचे घर उद्धवस्थ झाले आहे. पण अजूनही शिंदे सरकारने नुकसान भरपाई दिली नाही. १५ दिवस झाल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.”

“राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पण या सर्व गोष्टींकडे बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळ नसल्यामुळे नुकसानग्रस्त भागात लोकांना तातडीची मदत मिळालेली नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या करत आहेत”, असे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेना फुटीमागे पवारांचा हात म्हणणाऱ्या केसरकरांना पवारांनी दिलं एका वाक्यात उत्तर; म्हणाले…
हीच ती वेळ! जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहतेय; आदित्य ठाकरेंच सूचक ट्विट व्हायरल
‘संबंध बिघडल्यानंतर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now