शिमला मिरचीने आयुष्य केले कलरफुल! जाणून घ्या उच्चशिक्षित दांपत्याने फुलवलेली यशस्वी शेती

नाशिक । आपण बघत असतो अनेकजण मोठे शिक्षण घेऊन देखील ते यशस्वी शेती करतात. शेतीची नाळ ते तुटू देत नाहीत. अशाच प्रकारे कळवण तालुक्यात आदिवासी भागात  प्रयोगशील शेतकरी दांपत्य डॉ. कमलाकर बागूल व सुजाता बागूल यांनी इस्राईलच्या ‘कलरफुल’ शिमला मिरचीचा प्रयोग आपल्या तिऱ्हळ या गावी केला आहे.

या भातात कमी जास्त पाऊस, तसेच कमी बाजारभावयामुळे भाताचे पीक घेतले जाते मात्र यामध्ये काही परवडत नाही. यामुळे या दांपत्याने इस्राईलच्या ‘कलरफुल’ शिमला मिरचीचा प्रयोग करण्याचे ठरवले.

त्यांनी ३१ गुंठ क्षेत्राच्या पॉलिहाउसमध्ये इस्राईलमधील रिझवान येथून ‘बचाटा’ व ‘मसालिया’ जातीचे बियाणे मागवून त्याची माहिती घेतली. त्यांनी नाशिक येथील नर्सरीत त्याची रोपे तयार केली. ५०० रोपांची लागवड करून तीन महिन्यांनी त्याला फळ यायला सुरुवात झाली.

त्यांना १०० ते १५० रुपयांचा बाजारभाव सध्या मिळत आहे. मोठ्या शहरात, अनेक हॉटेल्समध्ये याला मोठी मागणी असते. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मोजक्या मजुरांच्या सहाय्याने हे उत्पादन त्यांनी मिळविले आहे.

त्यांनी या परिसरात यशस्वी करून तरुण शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी कमी पाण्यात कमी औषधाच्या सहाय्याने हे पीक घेतले आहे. त्यांची शेती बघण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर लोक भेट देत असतात.

पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा याच शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर ही शेती फायद्याची ठरते असे त्यांनी सांगितले. काहीवेळा नुकसान होते मात्र यातून खुप काही शिकता देखील येते, असेही ते यावेळी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.