शिल्पाच्या नंदेनेही दिली भावाची साथ, राजच्या पहिल्या पत्नीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. राज कुंद्राचे दुसरे लग्न आहे. शिल्पा शेट्टीसोबत लग्न करण्यापूर्वी राज कुंद्राने त्याची पहिली पत्नी कविताला घटस्फोट दिला होता. याबद्दल राज आणि शिल्पाने मौन बाळगले होते.

मात्र कविताने केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. तिच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज कुंद्राने घटस्फोट घेण्यामागचे कारणही सांगितले. तो म्हणाला की, कविता खूप विक्षिप्त आहे. माझी फॅमिली माझ्यासाठी सर्वकाही आहे. मात्र ती माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडिल, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होतो. त्यावेळी तिने माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत खूपच जवळीक वाढवली होती.

ती त्याच्यासोबतच जास्त वेळ घालवायची. मला सतत टाळायची. मी तिच्याशी या प्रकरणावर जेव्हा कधी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले होते. पुढे त्याने सांगितले की, या प्रकरणामुळे माझ्या बहिणीने युकेतील घर सोडले व ती भारतात परतली. भारतात आल्यानंतरही दोघांमध्ये काहीतरी सुरुच होते.

यादरम्यान बहिणीला तिच्या पतीचा दुसरा फोन मिळाला आणि त्यामधील मेसेज पाहून सर्व खुलासा झाला. माझ्या पत्नीचे आणि बहिणीच्या पतीचे संबंध होते. याबाबत माझ्याकडे पुरावे देखील होते मात्र दोघांनी हे नाते स्वीकारायला नकार दिला. शेवटी वैतागून मी कविताला घटस्फोट दिला. या प्रकरणाशी शिल्पाचा काहीही संबंध नाही. आता राज कुंद्राचे हे आरोप त्यांची बहीण रीना कुंद्रा यांनी बरोबर असल्याचे सांगितले आहेत.

रीना कुंद्राने कविताच्या तिच्या पतीशी असलेल्या संबंधाबद्दल सांगितले की, ‘मी नेहमीच कविताला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे वागवत होते. मला ती केवळ आवडत नव्हती तर तिच्यावर मला पूर्ण विश्वास देखील होता, आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. ती कधी असे करेल, असा मी विचारही केला नव्हता, हे खूप धक्कादायक होते, असे राजच्या बहिणीने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

बापरे! एका ट्रान्जेक्शनसाठी बँक तुमच्याकडून तब्बल ‘इतके’ रुपये आकारते; जाणून घ्या हे पैसे कसे वाचवता येईल

लग्नाच्या अगोदर ऋषी कपूरच्या लव्ह गुरु होत्या नीतू सिंग; अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंडसोबतचे भांडण सोडवले

काय सांगता! चोराच्या घरावरच डल्ला, ८ कोटीचे समान चोरी होऊनही तक्रार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.