काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते १० कोटी, मात्र…

मुंबई। अनेक कलाकार असे आहे जे कायम आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा कायम आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असल्याचे आपण पाहतो. ती कायम आपल्या फिटनेसची काळजी घेते व त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्री मानली जाते. तिच्या डान्स आणि फिटनेसचे चाहत्यांना वेड लागले आहे. शिल्पा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती आपल्या जेवणाची व पौष्टीक आहाराची कायम काळजी घेते. व तिचा घरगुती आणि पौष्टीक आहारावर तिचा प्रचंड विश्वास आहे.

याच विश्वासापोटी शिल्पाने एक १० कोटींची जाहिरात नाकारली आहे. ही एक स्लिमिंग पिल्सची म्हणजेच वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांची जाहिरात होती. मात्र अशा कोणत्याही गोळ्यांची जाहिरात न करण्याचा शिल्पाने निर्णय घेतला आहे.

वजन कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या कायम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतल्या जाव्या असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञ देतात. कारण अशा प्रकारच्या गोळ्यांचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. शिवाय स्लिमिंग पिल्स घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

त्यामुळं शिल्पानं अशा कुठल्याही गोष्टीची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. मात्र शिल्पाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिल्पाने पैशाचा विचार न करता योग्य तो निर्णय घेतल्याने अनेक चाहते तिला भरपूर प्रेम देत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.