भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या एका विडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये ती कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना ती म्हणाली, कोणी आपल्या आईला गमवतंय, कुणी आपल्या मुलांना. लोकांनी काय करायला हवं हे व्हीडीओमध्ये सांगत असताना शिल्पाचे डोळे अश्रूंनी डबडबले.

या कठीण काळात एकमेकांना मदत करण्याचे आवाहन तिने केले आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाने फ्रंटलाईन वर्कर्सचे देखील आभार मानले. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी लोकांना सकारात्मक करताना दिसून आली.

सध्या कोरोना परिस्थिती भयानक रूप धारण करत आहे. रूग्णालयात ऑक्सिजन मिळत नाहीत. म्हणून रूग्णांचे जीव गेल्याच्या घटना तर ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. यामुळे अनेक कलाकार मदतीसाठी पूढे येत आहेत.

सोनू सुद, सलमान खाननंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही मदतीसाठी पुढे आली आहे. व्हिडीओ शेअर करत असताना शिल्पा शेट्टी रडू आवरले नाही. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

कोरोना काळात देशात सध्या जी परिस्थीती सुरू आहे, त्यावर बोलण्यासाठी मी आलेय. मी अजिबात ठिक नाही, मीच काय. तर आपण सर्व जण सुरक्षित नाहीत.

हे सगळं पाहून मी खूप विचलीत होतेय. सगळ्यात विचलीत करणारे म्हणजे मृत्यू झाल्यानंतर आपल्या माणसांचे अंत्यसंस्कारही करू शकत नाही. हे बोलत असताना शिल्पा शेट्टी ढसाढसा रडू लागली.

लोकांना अन्न नाही, ऑक्सिजन नाही, म्हणूनच मी ‘खाना चाहिए’ या मोहिमेत जोडली गेली आहे. यामध्ये ती लोकांना जेवण देण्याचे काम करते, लोकांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन तिने केले आहे.

ताज्या बातम्या

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

करोडोंच्या संपत्तीचा मालक झाला तरी ‘या’ व्यक्तीला नाही विसरला शाहरूख; आजही ते दिवस आठवल्यावर..

पतीची तब्येत अचानक खालावली, डॉक्टर पत्नीने AC मधून ऑक्सिजन देत पतीचे प्राण वाचवले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.