सोशल मिडियावर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या वर्षी दुसऱ्यांदा आई बनली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी शिल्पा शेट्टी आई बनली होती. तिच्या मुलीचं नाव समीशा ठेवण्यात आलं होतं. तिचा आज (दि.15) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शिल्पाने समीशाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

समिशाचा व्हिडिओ शेअर करत शिल्पाने त्यावर कॅप्शन दिलं आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मागील वर्षाच्या प्रत्येक दिवशी आमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, प्रकाश आणला आहे. आम्ही खुप तुझ्यावर प्रेम करतो तुला खुप आयुष्य लाभो. असं कॅप्शन दिलं आहे.

व्हिडिओ मध्ये समिशा खेळताना दिसत आहे आणि ती मम्मा बोलत आहे. तसेच समिशाचे फोटो, शिल्पा शेट्टीने समिशाला घेऊन काढलेले फोटो आणि एक फॅमिली फोटो व्हिडिओ मध्ये दिसत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाख पेक्षा जास्त जणांनी लाइक केले आहे. तर काहींनी कमेंट्स करत समिशाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान समिशाच्या जन्मावेळी शिल्पाला गरोदरपणात काही समस्या होत्या. तिच्या मुलीचा जन्म सरोगसीतून झाला आहे. त्यामुळे 8-10 महिने शिल्पाने समिशाला खुप जपले होते. ती कधीच तिला बाहेर घेऊन जात नसे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला तिने पती राज कुंद्रासोबत समिशा गाणं गात असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक
छोट्या मुलाच्या डान्सवर फिदा झालेली माधूरी त्याच्या करीअरसाठी सरसावली; ‘इथे’ देणार संधी
बजरंगी भाईजानमधल्या ‘मुन्नी’ने स्विमिंगपुलमध्ये केला टायगर श्रॉफसारखा स्टंट; व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.