Share

Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj : शिल्पा शेट्टीच्या पतीकडून प्रेमानंद महाराजांना किडनी दानाची ऑफर! महाराजांनी दोघांना दिलं अनमोल उत्तर

Shilpa Shetty Raj Kundra met Premanand Maharaj :  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि तिच्या श्रद्धाळू स्वभावाची झलक तिच्या पोस्टमधून दिसून येते. अलीकडेच ती आपल्या पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यासह वृंदावन (Vrindavan) येथे पोहोचली. येथे त्यांनी संत प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान राज कुंद्राच्या एका भावनिक ऑफरने सर्वांना आश्चर्यचकित केले.

प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) हे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या श्रद्धास्थानी आहेत. या यादीत आता शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा (Raj Kundra) यांची भर पडली आहे. दोघांनी महाराजांचे प्रवचन ऐकले, मनातील शंका दूर केल्या आणि जीवन जगण्याच्या मार्गाबाबत मार्गदर्शन घेतले.

शिल्पाचा प्रश्न आणि महाराजांचे उत्तर

संवादादरम्यान शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) महाराजांना विचारले, “राधा जप कसा करावा?” त्यावर महाराज म्हणाले की, राधा जप माणसाला सर्व दुःखांपासून मुक्त करतो आणि संतांच्या वचनानुसार चालल्यास आयुष्य सुखमय होते.

राज कुंद्राची भावनिक ऑफर

गप्पांच्या वेळी प्रेमानंद महाराजांनी (Premanand Maharaj) सांगितले की, त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि ते गेली 10 वर्षे अशाच अवस्थेत जगत आहेत. ते म्हणाले, “कधीही देवाचा निरोप येऊ शकतो, पण आता याची मला भीती वाटत नाही.” हे ऐकल्यावर राज कुंद्रा (Raj Kundra) भावुक झाले आणि म्हणाले, “मी गेली दोन वर्षे तुम्हाला फॉलो करत आहे. माझ्याकडे कोणतेही प्रश्न नाहीत कारण तुमच्या व्हिडिओतून मला सर्व उत्तरं मिळतात. तुम्ही सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहात. मी तुमच्या उपयोगी पडलो तर माझी एक किडनी तुम्हाला देईन.”

महाराजांचा प्रतिसाद

राज कुंद्राची ही ऑफर ऐकून तेथे उपस्थित सर्वजण थक्क झाले, तर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही क्षण गप्प राहिली. प्रेमानंद महाराजांनी (Premanand Maharaj) प्रेमळ हसत उत्तर दिलं, “नाही… माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे की तुम्ही आनंदी राहा. देवाचा निरोप येईपर्यंत आम्ही किडनीच्या कारणाने जग सोडणार नाही. निरोप आला, की जायचंच असतं. पण तुमची ही सद्भावना मी मनापासून स्वीकारतो.”

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now