राज कुंद्रा कुठे गेला? फिल्म बनवायला? शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन झाल्यावर नेटकऱ्यांनी धरले शिल्पाला धारेवर..

सुपर डान्स ४ ची जज आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी करते. यावेळीही तिचा घरी बाप्पा विराजमान झाले आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक करून तुरुंगात टाकलं होत.

तीच कुटूंब तणावातून जात असताना तिने गणेशोत्सव साजरी करण्यात खंड न पडण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे फोटोज टाकले असता तिला तिच्या कुटुंबियांना राज कुंद्रा अटकेच्या प्रकरणावरून ट्रोल केले जात आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिल्पा शेट्टीने लालबागच्या राजाची प्रतिकृती आणली आहे.

नुकतेच तिने मुलगा विहान आणि मुलगी सामिषासोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असुन गणेश चतुर्थी आनंदाने साजरी करताना दिसले आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर गणेश पूजेचा व्हिडिओ टाकला आहे, यावरून तिला अनेक कंमेंट्स दिल्या आहेत. यावेळी तिला यूजरकडून ट्रोल केले आहे.

शिल्पाचा पती राज कुंद्रा याला १९ जुलैला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. त्याच्या विरोधात अनेक पुरावे सापडल्याने त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे अद्यापही राज कुंद्रा अटकेतच असुन जामीनाच्या प्रतिक्षेत आहे.

शिल्पा शेट्टीच्या फोटोवर कंमेंटन्स करत एक यूजर म्हणाला ” गणपती बाप्पा कुंद्राजींना देखील सद्बुद्धी द्या.” तर दुसरा यूजर म्हणाला, “राज कुंद्रा कुठे गेला फिल्म बनवायला” अजून एक म्हणाला, “मुलाचे बाबा कुठे दिसत नाही शिल्पा काकू.” अशा प्रकारे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे सुपर डान्सर ४ मधून तिने ब्रेक घेतला होता, पण आता ती सुपर डान्सरच्या सेटवर परत आली आहे. तसेच ती गणेश चतुर्थीही साजरी करत आहे.

 

महत्वाच्या बातम्या
काय सांगता! कियारा अडवाणीची डुप्लिकेट आहे तिच्यापेक्षा सुंदर? फोटो पाहून विश्र्वासच बसणार नाही
बातमी शेतकऱ्यांसाठी! पावसाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांनी दिले पावसाचे वेळापत्रक, वाचा..
‘तुझे गाणे ऐकण्यापेक्षा मी विष पिणे पसंत करेन’, असं म्हणणाऱ्या ट्रॉलर्सची टोनी कक्करने केली बोलती बंद
आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, साकीनाका पीडितेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ ढसाढसा रडल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.