मोठी बातमी: अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर..

पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा याची कसून चौकशी केल्यानंतर 19 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते ॲपवर सादर करणे हे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात राज व्यतिरिक्त आणखी काही लोकांना अटक करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये राज कुंद्रा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

शनिवारी राज कुंद्रा यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने सांगितले होते की त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे आणि आरोपपत्रात त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही.

मुंबई क्राईम ब्रांचने मॅजिस्ट्रेट कोर्टात राज कुंद्राविरोधात 1,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. 43 साक्षीदारांचे जबाब त्यामध्ये नोंदवण्यात आले होते. राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना 19 जुलै रोजी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती.

८ सप्टेंबरला राज कुंद्राच्या वकिलांनी तारीख मागितली होती. त्यानुसार राज कुंद्राच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार होती.

या प्रकरणी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी केली होती. यावेळी शिल्पा शेट्टीने सांगितले होते की, ती स्वतः खूप व्यस्त असते त्यामुळे तिला तिच्या पतीच्या कामाची कल्पना नाही. यामुळे पोलिसांनी शिल्पा शेट्टीला क्लीनचिट दिली होती.

 

महत्वाच्या बातम्या
चोराच्या उलट्या बोंबा! भर कोर्टात कंगणाने न्यायाधीशांवरच लावले गंभीर आरोप
पवनदीपने अरुणिताला नेलं हिल्स स्टेशनवर, हिल्स स्टेशनवर जाऊन दोघांनी केलं ‘हे’ काम, पहा व्हिडिओ
दीपिका पदुकोणचा विना मेकअपचा फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का, पी. व्ही. सिंधूनेही केली चेष्टा
मोठी बातमी! घोटाळ्यात किरीट सोमय्या यांनी घेतले थेट शरद पवारांचे नाव, राज्यात खळबळ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.