माझं पुर्ण कुटुंब कोरोना पाॅझीटीव्ह, प्लिज आमच्यासाठी प्रार्थना करा; शिल्पा शेट्टीची आर्त हाक

कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढणाऱ्या कोरोनाने सर्वसामान्य माणसांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटींना पण कोरोनाने गाठले आहे. शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला पण कोरोनाची लागण झाली आहे.

शिल्पा शेट्टी सोडून तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विहान, मुलगी समीक्षा, सासू सासरे आणि शिल्पाची आई या सर्वांची कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती चाहत्यांना केली आहे.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावरून म्हणते की, “गेले दहा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूपच कठीण गेले आहेत. आधी माझे सासू सासरे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर समिशा, विहान आणि आईला कोरोना झाला.

माझा नवरा राज पण पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या घरातील दोन स्टाफ मेंबर्सला पण कोरोना झाला आहे. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आता सगळ्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. या कठीण काळात मदत करणाऱ्यांचे आभार.”

तिने तिच्या चाहत्यांना पण आवाहन केले आहे. तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असा किंवा नसा, पण तरीही मास्कचा वापर आवर्जून करा. सुरक्षित राहा आणि एकमेकांशी बोलताना अंतर राखा असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे.

शिल्पा शेट्टीच्या आधी पण बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यात आमिर खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, आलीया भट, मनोज वाजपेयी यांचा समावेश होतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.