अभिनेत्री शिल्पा शिंदेनी बदलली फिल्ड; आता करतेय कंस्ट्रक्शन साईटवर काम, पहा व्हिडिओ

देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोनाच्या पाश्वभुमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, त्यामुळे हातावर हात धरुन न बसता अनेक लोकांनी नवीन व्यवसाय सुरु केला आहे.

अशात लॉकडाऊनमध्ये शुटींगही थांबवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अनेक कलाकारांच्या हाताला काम राहिलेले नाही. असे असतानाच भाभीजी घर पर है या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा हातात ड्रिलिंग मशीन घेऊन काम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिल्पाने इंडस्ट्री सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या व्हिडिओमध्ये शिल्पा कंस्ट्रक्शन साईटवर ड्रिलिंग मशीन घेऊन काम करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने एक कुर्ता घातलेला दिसून येत आहे आणि डोक्यावर एक कॅप घातलेली आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने व्हिडिओला जे कॅप्शन दिले आहे, त्यामुळे तिचे चाहते चांगलेच गोंधळून गेले आहे.

लॉकडाऊन लागला आणि मी कंस्ट्रक्शन फिल्डमध्ये शिरले आहे. ज्या लोकांकडे काम नाही, ते लोकं त्यांची फिल्ड बदलू शकतात. काळासोबत सगळे ठिक होईल. फक्त सध्या सकारात्मक रहा, असे शिल्पाने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

शिल्पाच्या व्हिडिओमुळे तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला का? अशा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. शिल्पाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी तिच्या या कामाचे कौतुक पण केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्रीसोबत डायरेक्टरला करायचा होता किसिंग सीन; स्वत:च सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव
सोनू सुदच्या चाहत्याने सुरू केलं ‘सोनू सुद मटन शॉप’; सोनू सुद म्हणाला, “मी शाकाहारी आणि माझ्या नावाने मटन शॉप…”
तुझ्यावर कोणी बलात्कार केला?; पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्याला शालूने शिकवला धडा, म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.