नवरा असुदे कारागृहात, बाप्पाचे आगमन होणार थाटामाटात, अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे बाप्पा होणार विराजमान

देशभरात गणेशोस्तवाचा सण सुरु झाला आहे. सामान्यांपासून अनेक कलाकारांपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पाचं आगमन होत. तसेच बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी सुद्धा दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं.

दरवर्षी अतिशय उत्साहाने तिच्या घरी बाप्पाचे आगमन होते. पण यावर्षी अशाच पद्धतीने होईल कि नाही याबद्दल शंका होती. परंतु शिल्पा शेट्टी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यावेळी पोर्नोग्राफी प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. शिल्पा शेट्टीने अशा परिस्थितीमध्येही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ती स्वतः बुधवारी गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी गेली होती.

यावेळी तिथे फोटोग्राफर्सची गर्दी झाली. यावेळी तिचा चेहऱ्यावर हास्य उत्साह आणि आनंद दिसत होता. दरवर्षी शिल्पा शेट्टी आपल्या पती राज कुंद्रासोबत गणपती बाप्पांना घरी वाजत गाजत घेऊन यायची अनेकदा तिचा मुलगा ही सोबत असायचा पण यावेळी ती एकटीच होती.

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणी तुरुंगात आहे. यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी केली होती पोलिसांनी शिल्पा शेट्टीला क्लीनचिट दिली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने सुपर डान्सर ४ या रियालिटी शोमधूनही ३ आठवड्यांसाठी ब्रेक घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबरला राज कुंद्राच्या वकिलांनी पुढील तारीख मागितली होती. त्यानुसार राज कुंद्राच्या जमीन अर्जावर १६ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
से*क्स करताना जोडीदाराच्या परवानगीशिवाय कंडोम काढता येणार नाही; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय
..आणि त्याने आपल्या सर्व मित्रांना घरी बोलावले व सर्वांना ७-७ कोटी रूपये दिले, वाचा मैत्रीची अनोखी कहाणी
साऊथचे ‘हे’ कलाकार आहेत 100 कोटी क्लबचे राजे; माहित नसेल तर जाणून घ्या साऊथचा सलमान खान?
तुरुंगातल्या नेत्याला पक्षात घेतलं म्हणून विरोधकांनी केली टीका; ओवैसींनी भाजपच्या नेत्यांचा क्रिमिनल रेकॉर्डच सांगितला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.