‘माझ्या मुलांसाठी आमच्या खाजगी आयुष्याचा आदर करा’; ट्रोलिंगला वैतागलेल्या शिल्पाने सोशल मिडीयावर जारी केले स्टेटमेंट

सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. त्याच्यावर अश्लीश चित्रपट बनवून ते ऑनलाईन पब्लिश केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत रोजच वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. अनेक अभिनेत्रींनी समोर येऊन राज कुंद्रा विषयी नवनवीन माहिती दिली.

या सर्व गोष्टींचा परिणाम शिल्पा आणि राज कुंद्रा सोशल मिडीयावर गाजत आहेत. याशिवाय दोघांनाही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व घटनांनंतर शिल्पाने पहिल्यांदाच स्टेटमेंट जारी केल आहे.

शिल्पाने तिच स्टेटमेंट सोशल मिडीयावर पोस्ट केल आहे. त्यामध्ये तीन लिहिलं आहे की, ‘हो, मागील काही दिवस प्रत्येक बाजू आमच्यासाठी आव्हानाने भरलेली आहे. अनेक प्रकारच्या अफवा आणि आरोप होत आहेत. सोशल मिडीयावरही आम्हाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले आहे.’

शिल्पा पुढे लिहिले आहे की, माझ्यासोबत माझ्या कुटुंबालाही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यात माझी भूमिका हीच राहणार आहे की, मी काहीच बोलणार नाही. एक अभिनेत्री म्हणून माझे हेच तत्व राहील की, कधीही तक्रार करू नका आणि स्पष्टीकरणही देऊ नका. कारण कोर्टात अद्याप केस सुरु आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.

केस संदर्भात शिल्पा पुढे लिहिते की, ‘मी या प्रकरणात शांतच राहणार आहे. त्यामुळे माझ्या नावाने खोट्या बातम्या करू नका. तसेच कोणत्याही अर्धवट गोष्टींवर कमेंट करू नका. मी एक कायदा पळणारी भारतीय  आणि मागील २९ वर्षापासून काम करणारी प्रोफेशनल स्त्री आहे.

लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर मी कोणाचाही विश्वास आजपर्यंत तोडला नाही. मी तुम्हाला आव्हान करते की, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या खाजगी आयुष्याचा सन्मान करा. या काळात आम्हाला एकटे सोडा, आम्हाला मिडिया ट्रायलची गरज नाही. कृपा करून कायद्याला त्यांचे काम करू द्या. सत्यमेव जयते!

हे ही वाचा-

कपड्यांप्रमाणे हा माजी मंत्री बदलतो बायको, कारनामे ऐकून बसेल धक्का

पूजा लोंढे हत्या प्रकरणी माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश, नागरिक रस्त्यावर, नराधमांवर कारवाईची मागणी

पुण्याच्या वेदीकाचा मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा तो व्हिडिओ आला समोर, पहा हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.